ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू एक जखमी

 
नगर, (दि.20 ऑक्टोबर) : नगर-मनमाड रोडने भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने धडक दिल्याने यामध्ये 38 वर्षीय इसमाचा मृत्यू  झाला  आहे.  तर  अन्य  एक  जण  गंभीर  जखमी  झाला  आहे.


माहिती अशी की, देहरे गावाच्या एस.टी.स्टँडजवळ गुरवारी (दि.15) रोजी साडेआठच्या सुमारास घडली आहे. नगर - मनमाड रोडने भरधाव वेगाने जाणार्‍या आरशय ट्रक (क्र.एम.एच.16, सी.सी.2052)  वरील निरंत्रण सुटल्याने चालकाने दोघांना उडवले.


या धडकेत रमेश कारभारी कोबरणे (वय 38, रा.गणेगाव, ता.राहुरी) यांचा जागीत मृत्यू झाला आहे. तर यामध्ये बाबासाहेब रघुनाथ उंडे (वय 32, रा.जुना नगर रोड, राहुरी) हे गंभीर जखमी झाले आहे. अपघात होताच ट्रकचालक घटनास्थळावरुन पसार झाला. 
 
 
या प्रकरणी बाबासाहेब उंडे यांच्या फिर्यादवरुन एमआयडीसी पोलिसांनी अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक राहूल शिंदे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post