नगर, (दि.19 ऑक्टोबर) : अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्याने राजेंद्र भोसले हे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.
पुण्यातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले हे आता अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.
डॉ.भोसले हे सन २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी नगर जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी म्हणून तीन महिने काम केले आहे.
महाराष्ट्र राज्यात आयएएस अधिकार्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून भोसले यांची नियुक्ती झाली आहे.
