बंद असलेल्या रक्तपेढीमधील पूर्ण कर्मचारी या ठिकाणी देण्याविषयी चर्चा झाली. तसेच अनेक दिवसांपासून येथे कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे येथील कर्मचार्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. त्यामध्ये सुधारणा न झाल्यास येथील कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश राजूरकर, परेश लोखंडे आदी उपस्थित होते
बोराटे म्हणाले की, मनपामध्ये कर्मचारी भरती व्हावी, याबाबत आपण स्वत: नगरविकासमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची आहे, तीच अवस्था मनपाच्या इतर विविध विभागांची आहे.
त्यामुळे कर्मचार्यांवरील ताण वाढला आहे. मनपाने तातडीने भरती करुन कर्मचार्यांची संख्या वाढवावी. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभाग बंद आहे, त्यामुळे मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयावरील ताण वाढला आहे.
मध्यंतरी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनपा आयुक्तपदाचा चार्ज आला असता त्यांनी या ठिकाणी पाहाणी करुन विविध उपाय योजना करण्याचे सांगितले. मात्र, याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर मनपाला पूर्णवेळ आयुक्त आल्याने त्यांनाही याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले. परंतु, याकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.