सातारा, (दि.25 ऑक्टोबर) : सध्या जागतिक स्तरावर कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव गेल्या सहा - सात महिन्यापासून सुरु आहे. सातारा जिल्हयातही कोरोनाने थैमान घातले आहे.
अद्यापपर्यंत कोणती लस किंवा प्रभावी गुणकारी औषध मिळालेले नाही, या पार्श्वभुमीवर प्रतिवर्षीप्रमाणे, रविवार दिनांक 25 आक्टोबर 2020 रोजी राजघराण्याचा होणारा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा योग्य ते सामजिक अंतर राखुन आयोजित करण्यामधील धोका लक्षात घेवून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहीती जलमंदिर पॅलेस, सातारा येथुन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयातुन एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
