आज १६८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्के
नगर, (दि.25 ऑक्टोबर) :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ३६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५१७ इतकी आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, जामखेड ०८, कर्जत १५, कोपरगाव ०१, नगर ग्रा १७, नेवासा ०६, पारनेर १०, पाथर्डी २६, राहुरी ०२, संगमनेर ०१, शेवगाव ३२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:५२३६६
*उपचार सुरू असलेले रूग्ण:१५१७
*मृत्यू:८४१
*एकूण रूग्ण संख्या:५४७२४
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक: २५ ऑक्टोबर, २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल
