तपोवन रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका : शहर शिवसेनेची मागणी

नगर, (दि.06 ऑक्टोबर) :  अनेक वर्षापासून दुरवस्थेत असलेल्या तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे. मात्र या रस्त्याचे निकृष्ट काम झाल्याने शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी अक्षेप घेऊन कामची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या पुण्याच्या कार्यालयामार्फत जुलै महिन्यात कामाची पाहणी दर्जाची तपासणीसाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षकांची नितुक्ती केली होती.

 

या पाहणीच्या अहवालाची मागणी करण्यासाठी शहर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एच.एन. सानप यांची भेट घेवून त्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, ऋषिकेश ढवन, दत्ता हजारे आदि उपस्थित होते.


यावेळी सेनेच्या सर्व पदाधिकार्‍यानी अभियंता सानप यांना धारेवर धरत चौकशी व गुणवत्ता तपासणी अहवाल अद्याप का प्राप्त झाला नाही, मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे तपोवन रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याने हा रस्ता पुन्हा नव्याने करावा,  रस्त्याच्या कामाची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढण्यात यावी, भ्रष्टाचार करणार्‍या ठेकेदारावर कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकावे अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.


यावेळी भगवान फुलसौंदर म्हणाले, मनमाड व औरंगाबाद रस्ता जोडणार तपोवन रस्ता  नगर शहरातील प्रमख रस्ता असून जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे. उपनेते अनिल राठोड यांनी या रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री निधीतील या पैशाचा मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. साडे तीन कोटी निधीतून तीन किलोमीटर होणार्‍या या रस्त्याच्या निकृष्ठ कामामुळे रस्यात तीन हजार खड्डे पडले आहेत. याचा जाब आम्ही कार्यकारी अभियंत्यांना विचारला आहे.


दिलीप सातपुते म्हणाले, शिवसेना नगर शहरातील विकासकामांच्या दर्जावर लक्ष ठेऊन आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय होवू नये यासठी आम्ही कायम आक्रमक असतो.


अभिषेक कळमकर म्हणाले, या कामात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदाराने बोगस काम केले आहे. यामुळे शिवसेना या ठेदारावर गुन्हा दखल करणार आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे.


आनंद लहानगे यांनी  गुणवत्ता निरिक्षकांचा अहवाल तबतोब शिवसेनेला देण्यात यावा अशी मागणी करून पाऊस थांबे पर्यंत या कामास सुरवात करू नका अशी सूचना केली.  


नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी तपोवन रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी शिवसेना शांत न बसता रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी  कार्यकारी अभियंता सानप यांनी अद्याप अहवाल कार्यालयास प्राप्त झाला नाहीये असे सांगून गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी यांच्या संपर्क करून अहवाला बद्दल चौकशी केली.

Post a Comment

Previous Post Next Post