यावेळी संचालक शहाराम चेमटे, शिवाजीराव तोरणे, नवनाथ धोंगडे, अजय लखापती, नामदेव बोरुडे, राधाकिसन आभाळे, उमेश डावखर, चंद्रकांत पडोळे, अभिमन्यू घोलवड, ललित पवार, विजया शिंदे, संजय गायके, सिताराम गागरे, राजू परदेशी, दत्तात्रय गडाख उपस्थित होते.
संस्थेच्या मंजूर उपविधीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर चेअरमन व व्हॉईस चेअरमन यांची नव्याने निवड करणे बंधनकारक आहे. परंतु सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभा झाली नाही. निवडीच्या प्रक्रियेसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून डी. टी. महाजन हे अध्यासी अधिकारी म्हणून होते.
चेअरमन या पदासाठी सत्ताधारी तमनर यांच्या गटाकडून शांताराम आवारी व व्हाईस चेअरमन पदासाठी दीपक वाळके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवारी यांच्या अर्जासाठी नारायण तमनर हे सूचक तर अनुमोदक अजय लखापती होते.
वाळके यांच्या अर्जासाठी सूचक प्रियंका मिसाळ व अनुमोदक उमेश डावखर होते. एकूण संचालकांची परिस्थिती पाहता विरोधी दत्तात्रय गडाख गटाच्या संचालकांनी कुठलाही अर्ज भरला नाही त्यामुळे निवडीची प्रक्रिया बिनविरोध पार पडली.
