नगर, (दि.18 ऑक्टोबर) : एमआयडीसी येथील कायझन अॅटोटेक कंपनीत चोरी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. कंपनीतील मशिनरी व साहित्य असा एकूण 65 हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक नितीन गायकवाड यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कंपनीतील लेथ मशिन, रोबोट वेल्डिंग मशिन फिचर्स, न्यूमेटिक पाईप कटींग मशिन व सीटचे पार्ट असा 65 हजाराचा ऐवज चोरून नेला.
पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ पवार करीत आहेत.
