नगर, (दि.05 ऑक्टोबर) : केडगावामधील मिलिंद रो-हौसिंग सोसायटी, शाहूनगर येथे प्रविण बाबासाहेब आंधळे यांच्या बंद घराचे कुलुप कोणतरी अज्ञात व्यक्तीने तोडून आतमध्ये प्रवेश करुन 50 हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे.
माहिती अशी की, केडगाव येथे राहणारे प्रविण बाबासाहेब आंधळे हे बाहेरगावी गेले असता, दि.29 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर दरम्यान घरफोडीची घटना घडली. यामध्ये बंद घराचे कुलूप तोडन आत प्रवेश करुन घरामधील वस्तुंची उचकापाचक करुन सुमारे 50 हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे.
या प्रकरणी आंधळे यांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ वाघमारे हे करीत आहे.
