नगर (दि.17 ऑगस्ट ) : दूध प्रश्नांसंदर्भात भाजपने सुरू केलेले आंदोलन हे फसवे आंदोलन आहे. भाजपने फक्त राजकारणासाठी हे आंदोलन सुरू केले असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. दरम्यान, दूध उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 20 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कोविड नियम न पाळता मोर्चा काढणार असल्याचे स्पष्ट पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले असून, त्यावर मोरे व लोंढे यांच्यासह शरद मरकड, रविराज जाधव, शंकरराव लहारे, सतीश पवार, मंगेश असबे आदींची नावे आहेत.
पुढे बोलताना मोरे म्हणाले की, दूध प्रश्नाच्या संदर्भांमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेळोवेळी सरकारला जाब विचारलेला आहे. मागील महिन्यामध्ये सुद्धा एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले होते. राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊ असे सांगितले. मात्र, असा एकही निर्णय न घेतल्यामुळे दूध उत्पादक शेतकर्यांच्या संदर्भामध्ये आता आंदोलन करण्यात आलेले आहे. त्याची सुरुवात सोलापूर येथून झालेली आहे असे त्यांनी सांगितले.
Tags:
Ahmednagar
