राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची केली पाहणी: आ. संग्राम जगताप

 चांगल्या दर्जाचे काम करण्याचे केले आदेश
 
 

नगर (दि.17 ऑगस्ट ) :  शहरातून जाणार्‍या राज्य व राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या अपघातामध्ये कोणीही मृत्यूमुखी पडू नये, यासाठी जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरु, उपअभियंता संजय गायकवाड व शाखा अभियंता अभय भांगे यांची बैठक घेऊन ताबडतोब महामर्गावरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने आदेश देण्यात आले. तत्काळ महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. पाऊस सुरु असल्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्यात येणार आहे. पाऊस उघडल्यानंतर लगेच शहरातील राज्य महामार्गावरील सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांचे मजबुतीकरण करुन डांबरीकरण करण्यात येणार आहे. एसटी चौक ते तारकपूर रोड, मनमानड रोड, बोल्हेगावपर्यंत तसेच एसटी चौक ते केडगाव व एसटी चौक ते औरंगाबाद रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे आ.संग्राम जगताप यांनी सांगितले.

राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची तारकपूर रोडवरील पाहणी करताना आ.संग्राम जगताप, जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरु, उपअभियंता संजय गायकवाड व शाखा अभियंता अभय भांगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, जॉय लोखंडे, सूरज जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नरेंद्र राजगुरु म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांनी बैठक घेऊन राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेच तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यामध्ये डांबरीकरणाचे काम करता येत नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात खड्डे बुजविण्याचे काम होत आहे. पाऊस उघडल्यानंतर तत्काळ डांबरीकरणाचे काम हाती घेऊन महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम केले जाईल असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post