जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत फुलणार राज्यफुल ताम्हण

 

नगर (दि.17 ऑगस्ट ) :  जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र, प्रियदर्शनी पब्लिक स्कुल, भिंगार व श्री.अम्मा भगवान फॉउंडेशन, अ.नगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यफुल आपल्या दारी या जिल्हास्तरीय उपक्रमाचे नगर येथील शासकीय निवासगृह येथे नुकतेच उद्धाटन करण्यात आले.

या उद्धाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी (माध्य).रामदास हराळ, शिक्षणाधिकारी (प्राथ) रमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारी अरूण धामणे, गटशिक्षणाधिकारी नगर चे रवींद्र कापरे यांसह जिल्हानिसर्गप्रेमी टिमचे जयराम सातपुते, संदिप राठोड, अमित गायकवाड, संदिप भालेराव, शिवकुमार वाघुंबरे, सचिन चव्हाण, राजेंद्र बोकंद, अजिंक्य सुपेकर आदी उपस्थित होते.

निसर्गप्रेमींच्या अथक प्रयत्नातुन प्रियदर्शनी स्कुल येथे पहिल्या टप्यात सुमारे दिड हजार रोपांची यशस्वी निर्मिती केली गेली असुन वर्षभर निगाही राखली गेली, या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत राज्यफुल म्हणुन मानचिन्ह असलेल्या ताम्हण या वृक्षाचे रोप मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांनी आपल्या प्रास्ताविकातुन दिली. ताम्हण पुष्पाबदल शास्त्रीय व पर्यावरणपुरक माहिती वनस्पती अभ्यासक अमित गायकवाड यांनी दिली तर उपस्थितांचे आभार संदिप राठोड यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post