नगर (दि.19 ऑगस्ट) : निळवंडे जलाशयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अभियंता मनोज डोके यांनी यासाठी नियोजन केले होते. विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सध्या धरणातून 5684 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. निळवंडे जलाशय 90 टक्के भरले असून या जलाशयातून 2000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.
Tags:
Ahmednagar
