महावितरणमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा : अहमदनगर मंडळातील 28 यंत्रचालक व तंत्रज्ञांचा गौरव

नगर (दि.17 प्रतिनिधी ) : महावितरणच्या अहमदनगर मंडळात विद्युत भवन येथे स्वातंत्र्य दिनी अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात अहमदनगर मंडळातील 5 यंत्रचालक व 23 तंत्रज्ञ  यांचा गेल्या वर्षभरात केलेल्या विविध व  विशेष कार्याबद्दल गुणवंत कामगार म्हणून अधिक्षक अभियंता संतोष सांगळे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प  देऊन गौरव करण्यात आला.

कोव्हीड 19 चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन व निसर्ग चक्रीवादळाच्या या कालावधीत सुद्धा अनेक अडचणींवर मात करीत नेहमीप्रमाणे अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणच्या तांत्रिक कर्मचार्‍यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजाविली असून अशाच प्रकारे स्वतःची सुरक्षिततेची काळजी घेऊन अपघातविरहित व ग्राहकांना अखंडित सेवा देण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी यावेळी केले.

दरवर्षी  महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त होणारा  हा सोहळा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर स्वातंत्र्यदिनी सुरक्षिततेचे नियम पाळीत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला व्यासपीठावर कार्यकारी अभियंते नितीन धर्माधिकारी, मनिषकुमार सूर्यवंशी आणि प्रकाश जमधाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन उपव्यवस्थापक श्याम नगरकर यांनी तर  उच्चस्तर लिपिक  अनिल तिजोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.   

तसेच मंडळातील पाचही विभागामध्ये कार्यालयस्तरावर सुद्धा आयोजित कार्यक्रमात  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात उत्कृष्ठ कामगिरी बजावून सेवा देणार्‍या विविध संवर्गातील एकूण  257 अभियंते,  अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

अहमदनगर  मंडळ  गुणवंत पुरस्कारप्राप्त कर्मचारी - यंत्रचालकाची नावे व कंसात 33/11 उपकेंद्र- दत्तात्रय वडतेले (बालम टाकळी), सतिष भुजबळ (पॉवर हाऊस), संतोष कोल्हे (चिखली), अनिल तावडे (श्रीगोंदा), संदीप धिवर (राहुरी),   

तंत्रज्ञ नावे व कंसात कार्यालय - अशोक पांगारे (माळीवाडा), सुनील पिटेकर (भिस्तबाग), ज्ञानेश्‍वर कोळी (देहरे), अर्जुन शेगावकर (वडझिरे), बापूराव ढाकणे (नेवासा शहर), राजू म्हस्के (पाथर्डी शहर), चंद्रकांत मैदाड (शेवगाव शहर), नवनाथ तवर (देवगाव), श्रीराम वाकचौरे (अकोले शहर), प्रदीप दिघे (वडगाव), मुकेश राठोड (संगमनेर शहर), सुनील अडोले (पुणतांबा), संतोष मोरे (कोपरगाव ग्रामीण), भास्कर रायसिंग (राजूर ग्रामीण), कैलास पवार (येसगाव), दुर्गेश साबणे (बेलवंडी), भरत नाईकनवरे (जामखेड शहर), विजय जाधव (माहिजळगाव), संजय कांबळे (श्रीगोंदा शहर), शांताराम सोनावणे (श्रीरामपूर ग्रामीण), रामदास पारखे (सात्रळ ग्रामीण), रामेश्‍वर मोटकर (कोल्हार ग्रामीण), समाधान शेवाळे (ब्राम्हणि ग्रामीण) यांचा समावेश होता.

विशेष सत्कार - महावितरणच्या  ग्राहक व कर्मचार्‍यांमध्ये विद्युत सुरक्षितता व रोहित्र बिघाड: कारणे व उपाय या विषयावर जागृती व माहिती देण्यासाठी वाकडी  उपकेंद्रातील  यंत्रचालक निलेश ठाकूर यांनी एकूण चार  ऍनिमेशन लघुपटाची निर्मिती केली आहे. अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची ही  संकल्पना असून त्यास यंत्रचालक निलेश ठाकूर यांनी मूर्त स्वरूप दिले आहे या विशेष कार्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post