१ हजार विद्यार्थ्याना यूपीएससी-आयएएस परीक्षेचे मोफत प्रशिक्षण : शशिकांत गाडे

नगर, (दि.15 जुलै) : प्रभादेवी येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आयएएस अ‍ॅकॅडमीतर्फे राज्यातील १ हजार मुलांना यूपीएससी, आयएएस परीक्षेचे मोफत प्रक्षिक्षण दिले जाणार असून त्याची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी दिली.

२००१ पासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून ६५ विद्यार्थी यात यशस्वी झाले आहेत.

अकॅडमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या राज्यातील १ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी. यात त्यांना एक वर्ष कालावधीचे मोफत प्रशिक्षण राज्यातील ३६ जिल्ह्यात ऑनलाइन देण्यात येणार आहे. अकरावीपासून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावे, असे आवाहन प्रा.गाडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post