नगर, ( दि.02 जुलै ) : अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १० बाधित रुग्णांची भर पडली. आजच्या अहवालात या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.
आज बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ०२, श्रीरामपूर ०५, पेमरेवाडी (संगमनेर) ०१, दाढ बु. (राहाता) ०१, भिंगार येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.
यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६२ इतकी झाली आहे. आज बाधित आढळलेले सर्व रुग्ण हे यापूर्वीच्या बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत.
५७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह
आज जिल्ह्यातील ५७ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले. सध्या एकूण नोंद रुग्ण संख्या ५१० इतकी झाली आहे.
जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांनी कोरोनावर मात
दरम्यान, जिल्ह्यात आज तब्बल २१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. यात, नगर मनपा ०९, संगमनेर ०७, श्रीरामपूर ०२, राहाता, पारनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३३ झाली आहे.
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)*
दिनांक:२ जुलै, २०२० दुपारी १ वा.
Tags:
Ahmednagar
