अध्यक्षपदी अॅड.सुभाष लांडे तर
कार्याध्यक्षपदी सुवर्णा शिंदे,
सेक्रेटरी अॅड.सुधीर टोकेकर
नगर,(दि.02 जुलै) : जिल्ह्यातील आशा कर्मचारी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा संघटनेच्या बुरुडगांव रोड, अहमदनगर येथील कार्यालयात नुकतीच मोजक्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन संघटनेच्यावतीने शासनाकडे प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरवठा करणे, संघटनेच्या सदस्यांची समस्या सोडविणे, मागील वर्षाचा आढावा घेऊन संघटनेची पुढील दिशा ठरविण्यात आली. तसेच यावेळी नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी अॅड. सुभाष लांडे, कार्याध्यक्षपदी सौ. सुवर्णा मधुकर थोरात (शिंदे) तर जनरल सेक्रेटरीपदी अॅड. सुधीर टोकेकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.
यावेळी इतर कार्यकारिणीची घोषणाही अध्यक्ष अॅड.सुभाष लांडे यांनी केले. यामध्ये उपाध्यक्ष - कविता गिरे (श्रीरामपूर), भारती गायकवाड (अकोले), संध्या पोटफोडे (शेवगांव), सहसेक्रेटरी - सुषमा कपाटे (कोपरगांव), कोमल कासार (वाळकी), स्वाती इंगळे (पारनेर), खजिनदार - सुजाता खाडे (पारनेर), कार्यकारिणी सदस्य - मनिषा डांभे (पाथर्डी), उषा दिघे (संगमनेर), सुवर्णा मरकड (पाथर्डी), उषा अडांगळे (अकोले), नाजिया पठाण (कर्जत), मंगल नगरे (नेवासा), मंगल शिंगाणे (जामखेड), अश्विनी गोसावी (राहाता) आदिंची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष अॅड.सुभाष लांडे म्हणाले, राज्यभर आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरवा करु अनेक मागण्या आपण मंजूर करुन घेतल्या आहेत. अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित असून, त्यासाठी विविध स्तरावर ते मांडले जात आहे. संघटनेचे कामकाम चांगल्या पद्धतीने सुरु असून, आता जाहीर झालेले नूतन पदाधिकारी संघटनेच्या कार्यात भरीव योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी जनरल सेक्रेटरी अॅड.सुधीर टोकेकर यांनी संघटनेच्या मागील वर्षाच्या अहवाल वाचन करुन संघटनेच्या कार्याचा लेखा-जोखा मांडला. संघटनेच्यावतीने आशा कर्मचारी, गटप्रवर्तक यांचे वेतन, भत्ते, सोयी-सुविधा, अतिरिक्त काम, अशा विविध प्रश्नांसंदर्भात शासनास्तरावर पाठपुरवा सुरु असून, त्यास टप्प्याटप्प्याने यश मिळत आहे. नुतन पदाधिकारी व कार्यकारिणी संघटनेच्या कामात सक्रीय सहभाग देऊन कर्मचार्यांचे प्रश्न सोडवतील असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी नूतन कार्याध्यक्षा सुवर्णा थोरात यांनी संघटनेचे आपल्यावर जी जबाबदारी टाकली आहे, ती सर्वांना बरोबर घेऊन पूर्ण करु. संघटनेच्यावतीने सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्तरावर प्रयत्न करु. सदस्यांनीही संघटनेच्या कामात आपले योगदान द्यावे. जास्तीत जणांनी संघटनेत सहभागी व्हावे, असे आवाहन करुन सर्वांचे आभार मानले.
यावेळी ताळेबंद, बँक खाते व्यवहार, वार्षिक वर्गणी,आंदोलने, प्रलंबित प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सदस्यांनी ऑनलाईन चर्चेत सहभागी होऊन आपली मते मांडली. दि.3 जुलै रोजी सर्व कामगार संघटनेचा एक दिवसीय संप असून, कामगार कायदेश बदलण्याच्या विरोधात हा संप असून, सप्टेंबर 2019 पासून जी वाढ रु. 2000 केली आहे ती सप्टेंबर पासून द्यावी, व त्याचा फरकही द्यावा, यासाठी निषेध दिन म्हणून आशा व गट प्रवर्तक प्रत्येक तालुक्यात काळ्या फिती लावून निवेदन देणार आहेत.

Tags:
Ahmednagar