गणेश मूर्ती कारखाने व घरोघरी मूर्ती बनविणार्यांना लॉकडाऊनमधून वगळावे : मागणी

मुंबई (दि.20) : अनेक कुटुंबे घरोघरी गणेश मूर्ती बनवून उपजीविका करतात. हजारो नागरिकांची अर्थव्यवस्थाच गणेश मूर्ती बनविण्याच्या पारंपरिक व्यवसायाशी निगडित आहे. मूर्ती साचे करणे, मूर्ती घडवणे,  रंगरंगोटी  ही सर्व  कामे हस्तकला असल्याने मूर्ती घडवायला वेळ जातो. गणेश मूर्ती घडविण्यास प्रारंभ न केल्यास गणपतीत मूर्तींची टंचाई भासू शकेल. तरी गणेश मूर्ती कारखाने व घरोघरी मूर्ती बनविणाऱ्या कौटुंबिक मूर्तिकारांना लॉकडाऊनमधून वगळण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार रविंद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे केली आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रामुख्याने पेण तालुका परिसरातील गणपती मूर्तिशाळांना लॉकडाऊनमधून वगळण्यात यावे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक तसेच राज्याबाहेरही भाविक पेण परिसरातील मूर्तीची घरात प्रतिष्ठापना करतात. येथील हजारो कुटुंबांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन गणेश मूर्ती व्यवसायावर अवलंबून आहे, त्यामुळे मूर्तिकारांना लॉकडाऊनमधून वगळण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post