नगर (दि.16) : प्रतिबंधात्मक आदेश धुडकावत कंटेनरमधून प्रवास करणार्या 82 मजूरांना कोतवाली पोलिसांनी आज केडगाव बायपास येथून ताब्यात घेतले आहे. या सर्वांना गिते पाटील व सिद्ध लॉन्स येथे ठेवण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन कंटेनर बेकायदेशीर रित्या वाहतूक करणार्या त्या कंटनेर चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पकडण्यात आलेल्याची उद्या तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
विनोद सिंग ठाकूर (रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. पोलीस हवालदार भास्कर मिसाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्या कंटनेरमधील मजूर हे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी ठिकाणचे असल्याची प्राथमिक माहितीत समोर आली आहे. सदरचे सर्व व्यक्ती नगर-पुणे रस्त्याने आप आपल्या गावी चालले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.
सदरच्या कारवाईची नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. तहसीलदार पाटील यांनी सर्व मजुरांना गिते पाटील व सिद्ध लॉन्स येथे ठेवले आहे. सर्वांची उद्या वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले.