श्रीगोंदा तालुक्यात दोन ठिकाणी जबरी चोऱ्या

एका महिलेसह तीन जण जखमी

श्रीगोंदा  (दि.17) : बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंप्री कोलंदर व ढोरजे गावाच्या सरहद्दीत दोन ठिकाणी जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये वृध्द दाम्पत्यासह तीन जण जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथील आप्पा रामा भोंडवे व गंगुबाई आप्पा भोंडवे हे दाम्पत्य घरात झोपले असताना अज्ञात तीन चोरट्यांनी कडी तोडून घरात प्रवेश केला आणि या दोघांना बेदम मारहाण करीत सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण ३२ हजारांचा ऐवज चोरून नेला. या मारहाणीत हे दोघेजण जखमी झाले आहेत. 
 
दुसऱ्या घटनेत ढोरजे येथील पोपट कोहक ( वय ५०) या किराणा दुकानदारास मारहाण करून लुटले. कोहक त्यांच्या किराणा दुकानाच्या पाठीमागील खोलीत झोपले होते. यावेळी चार चोरट्यांनी त्यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. त्यांच्याकडील २२ हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार झाले. या दोन्ही घटनांबाबत बेलवंडी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितल.

Post a Comment

Previous Post Next Post