आदर्शवत प्रजासत्ताक राज्य निर्माण करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले : संभाजी कदम

नगर, (दि.14) : सर्व भारतीयांचे कल्याण साधणे, देशातील गोरगरीबांचे शोषण नष्ट करणे आणि भारताचा जलदगतीने विकास साधणे हेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयुष्याचे ध्येय होते. तळागातील लोकांना त्यांचे हक्क मिळवून देऊन समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त करुन देण्यासाठी त्यांनी लढा दिला. स्वातंत्र्य भारताची राज्य घटना तयार करुन प्रत्येकाला हक्क मिळवून देऊन कर्तव्याचीही जाणिव करुन दिली आहे. सर्व भारतीय हे राज्यसंघटने एक संघ झाले आहेत. एक आदर्शवत प्रजासत्ताक राज्य निर्माण करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आज कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर हीच सांघिक भावना सर्व भारतीयांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वजण एकत्रित लढा देत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतांना संभाजी कदम.  समवेत गणेश दहीहंडे, विष्णू थोरात, शेखर आढाव, प्रकाश थोरात, अभिजित कारखिले, सागर थोरात, रोनक मुथा, आकाश हुच्चे आदि उपस्थित होते. प्रशासनाच्या आवाहनानुसार घरात राहून गर्दी न करता साध्यापद्धतीने जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी संभाजी कदम यांनी कोरोनाच्या प्रदुर्भावाबाबत प्रशासनाच्यावतीने ज्या सूचना देण्यात येत आहेत, त्याचे पालन करुन सहकार्य करावे. आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच गरजूंना आवश्यक ती मदत केली जात आहे.

याप्रसंगी नगरसेवक दता कावरे ,वसंत शितोळे आदिंनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांना प्रशासनाच्यावतीने वेळोवेळी जाहीर केलेल्या सूचनांचा पालन करण्याचे आवाहन केले. तसेच प्रभागातील नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर राहू असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post