दाळमंडईत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

दोन व्यापार्‍यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

दुकानात 20 हजाराची तंबाखू व पान मसाला 



नगर (दि.27) : दाळमंडई येथील महाराज जनरल स्टोअरमध्ये तंबाखू व हिरा पान मसाल्याचा विक्रीसाठी साठा केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करुन दोघा व्यापार्‍याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पान मसाला व तंबाखू विक्रीस सरकारची बंदी असतानाही, महाराजा जनरल स्टोअर्समध्ये 19 हजार 624 रुपयांचा तंबाखू व हिरा पानमसाल्याचा साठा आढळून आला आहे. त्यामध्ये 89 पाकीटे हिरा पानमसाला व 90 पॅकेट तंबाखूचा समावेश असून ते विक्री करण्याच्या उद्देशाने त्यांची साठवणूक करण्यात आली अशी फिर्याद अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली.

त्यांच्या फिर्यादवरुन पोलिसांनी सुनील हिरालाल पोपटानी, हिरालाल फेलमल पोपटानी (रा.मिस्किन नगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक घायतडक करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post