तलाठी अशोक थोरात दहा हजारांची लाच घेताना पकडला

तलाठी अशोक थोरात दहा हजारांची लाच घेताना पकडला

वाळूचा टॅ्रक्टर सोडण्यासाठी लाचेची मागणी


नगर (दि.27) : वाळूचा टॅ्रक्टरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाचेची मागणी करणार्‍या राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील तलाठी अशोक रामचंद्र थोरात (वय 49,रा.तनपुरेवाडी,ता.राहुरी) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि.27 मार्च रोजी सकाळी ताहराबाद येथे करण्यात आली.

तक्रारदारांच्या मालकीचा टॅ्रक्टर वाळू वाहतुक करताना रविवारी दि.26 रोजी पहाटे तलाठी थोरात यांने पकडला होता. टॅ्रक्टरवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता टॅ्रक्टर सोडून देण्यासाठी थोरात याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करून त्यातील 40 हजाराची रक्कम रविवारी स्वीकरली होती. सोमवारी  सकाळी उर्वरित रक्कम 10 हजारांची रक्कम ताहराबाद तलाठी कार्यालयासमोर स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने थोरात याला रंगेहाथ पकडल.

ही कारवाई उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाम पवरे, प्रशांत जाधव, विजय गंगूल, हरुन शेख, राधा खेमनर, संध्या म्हस्के आदिंच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post