अहमदनगरमध्ये अजून तीन कोरोनाबधित वाढले


नगर (दि.06) : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील एनआयव्हीकडे पाठविलेल्या ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नगर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २४ झाली आहे.

बाधित व्यक्तींपैकी २ व्यक्ती या आलमगीर (ता. नगर) येथील तर १ व्यक्ती नगर शहरातील सर्जेपुरा भागातील आहे. आलमगीर येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात या व्यक्ती आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाले आहे. या तीन व्यक्ती अनुक्रमे ५४, ४८ आणि २७ वर्ष वयाच्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post