आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने
जिल्हा रुग्णालयास पाचशे तर पोलीसांना शंभर लिटर सॅनीटायझरचे वाटप
जिल्हा रुग्णालयास पाचशे तर पोलीसांना शंभर लिटर सॅनीटायझरचे वाटप
नगर (दि.07) : देशासह महाराष्ट्रात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्याच्या लढ्यात महत्त्वपुर्ण योगदान देणार्या पोलीस प्रशासन व डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी यांच्यासाठी बारामती अॅग्रोचे चेअरमन तथा आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात पाचशे तर पोलीस अधिक्षक कार्यलय येथे शंभर लिटर सॅनीटायझर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक तालुकाध्यक्ष मनोज भालसिंग, वैभव खेंगट, बाळासाहेब बोठे, राजेंद्र आव्हाड, उमेश भांबरकर, संजय लोखंडे आदि उपस्थित होते.
कोरोनाशी लढा देताना सॅनीटायझर हे जीवनावश्यक वस्तू बनले आहे. जिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासनातील सहकारी कर्तव्य बजावत असताना त्यांना सॅनीटायझरची नितांत आवश्यकता आहे. या सामाजिक बांधिलकीने आमदार रोहित पवार यांच्या वतीने सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने योगदान देण्याची गरज असल्याचे दादाभाऊ कळमकर यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयाचे मुख्य औषध निर्माण अधिकारी दिलीप बोंदर्डे यांच्याकडे सॅनीटायझरचे ड्रम सुपुर्द करण्यात आले.