युवक काँग्रेस अध्यक्षांनी घेतला पुढाकार
नगर (दि.25) : टीव्ही सेंटर, बिशप लॉइड कॉलनी भागातील नागरिकांना अद्यापही नळाद्वारे घरामध्ये पाणी येत नाही, त्यांना अनेक दिवसापासून महानगरपालिका टँकरची व्यवस्था करत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे गेल्या 25 दिवसांपासून तेथे टँकर पोहोचला नाही. या कारणाने नागरिक अतिशय त्रस्त झाले होते. अनेक वेळा पालिका कर्मचार्यांना फोन करूनही काही होत नव्हते. अखेर त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांना फोन केला. त्यांनी त्वरित या बाबीची दखल घेतली.
मनपामधील पाणीपुरवठा अधिकार्यांना संपर्क साधला व या भागात त्वरित पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली. त्यानंतर अवघ्या काही तासातच तेथे पाण्याचा टँकर पोहोच झाला. गेले अनेक दिवसांपासून युवक काँग्रेस अतिशय तत्परतेने अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे. त्यामुळे नागरिक युवक काँग्रेसकडे प्रश्न सोडविण्रासाठी धाव घेत असल्याचे पाटोळी यांनी सांगितले आहे.
आपली कुठलीही अडचण असेल तर आपण आम्हाला फोनद्वारे कळवावी. आम्ही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत. नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्र करावे, असे आवाहन मयूर पाटोळे यांनी युवक काँग्रेसच्या वतीने केले आहे.
Tags:
Ahmednagar
