नगर मधील तिसरा कोरोना बाधित रुग्ण बरा होवून घरी परतला


नगर (दि.10) :  जिल्ह्यातील तिसर्‍या कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्हीही चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्याला शुक्रवारी (दि.10) सायंकाळी शुभेच्छा देऊन घरी रवाना केले आहे.

यशस्वी उपचार घेवून या अगोदर दोन रुग्ण घरी रवाना करण्यात आले असून आता तिसरा रुग्ण देखील घरी सोडण्यात आला आहे. तिसरा रुग्ण ही घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत 122 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले आहेत. या पैकी 103 अहवाल शुक्रवारी (दि.10) सकाळी प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये तिसर्‍या कोरोना बाधित व्यक्तीच्या अहवालाचा समावेश आहे. तिसर्‍या कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास आरोग्य यंत्रणेने शुभेच्छा देऊन घरी रवाना केले.

Post a Comment

Previous Post Next Post