नगर (दि.28) : नगर - मनमाड महामार्गावरील गुहा गावाच्या शिवारात ट्रक चालकाला मारहाण करून लुटणार्यांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. संतोष राजेंद्र विधाते (वय 24), सागर सीताराम विधाते (वय 30), अप्पासाहेब केशव वाडकर (वय 30 सर्व रा. वरशिंदे, ता.राहुरी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दि.21 एप्रिलला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सातार्याला जात असताना ट्रक पंक्चर झाल्याने पंक्चर काढण्यासाठी नगर - मनमाड मार्गावरील गुहा गावाच्या शिवारात साईगंगा हॉटेलजवळ ट्रक थांबवली. या दरम्यान, मोटारसायकलवर आलेल्या तीन अज्ञातांनी दमदाटी करून जवळील रोख रक्कम, मोबाईल असा एकूण 15 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेल्याची फिर्याद राहुरी पोलिस ठाण्यात ट्रकचालक विशाल श्रीराम वाडेकर (रा.मोहाडी पिंपळादेवी, जि.धुळे) यांनी दिली होती.
तपास सुरू असताना, हा गुन्हा संतोष विधाते व त्यांच्या साथीदारांनी मिळून केला आहे, अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांना मिळाली. त्यानुसार राहुरी येथे जाऊन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिलीप पवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार पोहेकाँ मनोहर गोसावी, पोना रवींद्र कर्डीले, ज्ञानेेशर शिंदे, राहुल सोळुंके, सागर ससाणे, मयुर गायकवाड, रवी सोनटक्के, चालक पोहेकाँ संभाजी कोतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.