परमीटरुम, वाईन्स दुकानदारांचे रजिस्टर तपासा : मागणी

निर्भय नवजीवन फाउंडेशनची कारवाईची मागणी


नगर (दि.28) : कोरोनाच्रा पार्श्‍वभमीवर लॉकडाऊनच्या काळात नगरमध्ये परमीट रुम व वाईन्स दुकान बंद असताना छुप्या पद्धतीने चढ्या भावाने दारुची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यात आली. बेकायदेशीर दारु विकणार्‍या परमीट रुम व वाईन्स दुकानदारांचे स्टॉक रजिस्टर तपासून कारवाई करावी अशी मागणी निर्भय नवनजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप भांबरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

एका वृत्तपत्राने परमीटरुममध्येे मागच्या दाराने दारु विक्री आणि लॉकडाऊनच्या काळात वाईन्स दुकाने आणि गोडावून झाले रिकामे तसेच दारु विक्री करणार्‍यांचे रजिस्टर तपासा असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर  राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी खडबडून जागी झाले होते. या वृृत्ताची दखल घेत अधिकार्‍यांनी परमीटरुमसह दारुची दुकाने सील केले होते. आता सामाजिक संस्थेने दारु विक्रेत्यांचे स्टॉक रजिस्टर तपासा अशी मागणी केली आहे.

निर्भय वनजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष भाबंरकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की,  नगर शहरातील काही परमीटरुम व वाईन्स दुकानादार व होलसेल दारु विके्रत्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असताना सर्व नियम पायदळी तुडवून त्यांच्या परमीटरुम व वाईन शॉप तसेच होलसेल गोडाऊनमधील देशी व विदेशी दारुचा माल चढ्या भावाने विकला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यांची दुकाने सील करण्याआधीच ही दारु विक्री झाली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार सर्व परमीटरुम व वाईन शॉप धारकांना नियम ठरून दिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा दररोज किती माल दारु विक्री होतो याची दैनदिन माहिती कळवावी लागते. दि. 19 मार्च रोजी दुपारी चारनंतर नगर शहरात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. दि. 17 व 18 मार्च रोजीची संपूर्ण मालाची राज्य उत्पादन शुल्क विभागाला प्राप्त झाली असेल. त्यामुळे बेकायदेशीर दारु विक्री केलेल्या मालाविषयी स्टॉक रजिस्टर चेक करून संबंधित दारु विकणार्‍यावर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे भांबरकर यांनी निवेेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post