55 लाख साईभक्तांनी घरबसल्या घेतले साईदर्शन

लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन देणगीचा ओघही सुरु



शिर्डी  (दि.28) : जगातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्रा शिर्डीच्रा साईबाबांचे लॉकडाऊनच्रा दरम्यान सुमारे 55 लाख साईभक्तांची ऑनलाईन घरबसल्या दर्शन घेतले. दर्शनाचा लाभ घेतानाच या भाविकांनी साईबाबांच्या चरणी ऑनलाईन देणगी देण्याची परंपरा कायम राखली आहे.

कोरानाचा जंतुसंसर्ग रोखण्यासाठी शिर्डीचे साईमंदिर 17 मार्चपासून भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. साईबाबांची महती सातासमुद्रापार पोहचली असून देशविदेशातील कोट्यावधी भाविकांची बाबांवर अपार श्रध्दा आहे. दररोज सुमारे पन्नास हजाराहुन, तर वर्षाकाठी सुमारे तीन कोटी भाविक साईदरबारी हजेरी लावत असतात. मात्र, लॉकडाऊन असल्याने भाविकांना शिर्डीत येता येत नसल्याने भाविक घरबसल्या वेबसाईट, मोबाईल व टाटास्कायच्या माध्यमातून दररोज नित्यनियमाने लॉनलाईन दर्शनाचा लाभ घेत आहेत.

18 मार्च ते 26 एप्रिल दरम्यान, साडेतीन लाख लोकांनी साईबाबा संस्थानच्या वेबसाईटवरुन बाबांचे दर्शन घेतले आहे. या माध्यमातून रोज सरासरी 8 हजार 764 भाविक या सेवेचे लाभ घेत आहे. साईबाबा संस्थानने मोबाईल अ‍ॅप बनलेला आहे. जगभरातील जवळपास एक लाखाहुन अधिक भक्तांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केलेला आहे. रोज कमीतकमी 25 हजार भक्त याच्या माध्यमातून साईबाबांशी जोडले असतात. या अ‍ॅपच्या मदतीने बंदच्या काळात आजवर दहा लाख भक्तांनी साई दर्शनाचा आनंद घेतला असल्याचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post