आ. नीलेश लंके यांचा मुक्या प्राण्यांनाही आधार


मुक्या प्राण्यांचाही विचार करणारा ‘प्राणीमित्र’

नगर (दि.26) : गेल्या महिनाभरापासून सर्वानांच मदतीचा हात देणारे आमदार निलेश लंके यांनी आता मुके प्राणी देखील उपाशी राहू नयेत यासाठी पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊमुळे वडगाव दर्या येथील माकडांची उपासमार होत असल्याची बाब त्यांच्या कानी पडली आणि त्यांनी थेट दर्यामातेच्या मंदीराकडे फळासह खाद्यपदार्थ घेवून जाण्याची तयारी केली. 

आ.नीलेश लंके यांनी प्राण्यासाठी फळे आणि फुटाणे आणल्याने ते खूश झाले असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. जगप्रसिद्ध लवणस्तंभ, तसेच दर्याबाईचे देवस्थान असलेल्या वडगाव दर्या येथील माकडे हे भक्त, तसेच पर्यटकांच्या फळे, फुटाण्यांच्या मेजवानीला महिनाभरापासून मुकले होते. त्याच्यावर उपासमारीचीच वेळ येवून ठेपली होती. मात्र, आ.लंके यांनी तातडीने त्याच्याही पोटाची खळगी भरण्याचा निश्‍चय केला. यातुन प्राण्याची उपासमारी टळली.

देवीच्या दर्शनासाठी रोजच वडगाव दर्याला देशी - विदेशी पर्यटक व भाविक भेट देत असतात. या मंदीर परिसरातील दरी व तेथील जंगलात लाल तोंडाच्या माकडांचे वास्तव्य आहे. कितीही दुष्काळ असला तरी या ठिकाणी पाण्याची चणचण भासत नाही. येथे येणारे भक्त भाविक व पर्यटक माकडांसाठी फळे, फुटाणे खरेदी करून त्यांच्या पुढ्यात टाकत असल्याने या माकडांसाठी ती दररोजची मेजवाणी असायचीे. मात्र, सध्याच्या स्थितीमध्ये कोणीही या परिसरात फिरकत नसल्याने मुक्या प्राण्यावर उपासमारीची वेळ येवून ठेपली होती. मात्र, ही स्थिती समजताच आ.लंके यांनी प्रण्यांची उपासमार टाळली आहे.

करोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व या जैविक विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करत पारनेर - नगर मतदारसंघाचे आ.नीलेश लंके यांचा कनवाळू व साधेपणा व समाजासाठी झोकून देत दिवसरात्र समाजाची सेवा करणारा एक सामान्य आमदार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. माझ्या मतदार संघात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही असे वारंवार सांगतले गेले, अनेक दिवस शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत मतदार संघातील गावोगावी किराणा वाटप, येथील परप्रांतीय बेरोजगारांना मदतीचा आधार, भाजीपाला वाटप व अन्नछत्राच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी मतदार संघातील व मतदार संघाच्या बाहेरील हजारो उपाशी जनतेस ते अन्नदान करत आहेत.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मतदार संघातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची स्वतः रस्त्यावर उतरून खात्री करत गोरगरीब, निराधार, गरीब, परप्रांतीय, गरजवंत व इतर जिल्ह्यातून आलेल्या शेतमजूर, कामगार, वाटसरू, वाहनचालक यांना पोटभर भोजन पुरविणारा आमदार ही ओळख असतानाही मनुष्या बरोबर मुक्या प्राण्यांचाही विचार करणारा प्राणीमित्र ही नवीन ओळख त्यांची निर्माण झाली आहे.

लॉकडाऊन झाल्यापासून महाराष्ट्र सरकारने सर्व देवस्थाने बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने व जनतेनेही आपले घर सोडून बाहेर पडू नये असे आवाहन केल्याने हजारो भाविकभक्त कुठल्याही मंदिर परिसरात जाण्याचे टाळत आहेत. त्यामुळे पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या येथील माता दर्याबाई व वेल्हाबाई या जागृत देवस्थान असणार्‍या मंदिर परिसरात शेकडो माकडांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानवता हाच धर्म हे ब्रीद सांभाळणार्‍या आमदार लंके यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी तात्काळ त्यांचे सहकारी असणारे डॉ.कावरे, राजूशेठ खोसे, श्रीकांत चौरे, नीलेश आढाव, अमोल दळवी, अनिल सूर्यवंशी यांच्या मदतीने फळे घेऊन मंदीर परिसरात जात सर्व मुक्या प्राण्यांना स्वतःच्या हाताने पोटभर फळे खाऊ घातली.

Post a Comment

Previous Post Next Post