एप्रिलचा पूर्ण पगार मिळणार; शिक्षक भारतीच्या प्रयत्नाना यश : सुनिल गाडगे



नगर (दि.24) :  मार्च महिन्याचा पगार 25 टक्के कापला गेला तरी एप्रिलचा पगार पूर्णपणे एकाच टप्यात मिळणार आहे. उशीर झालेला असला तरी बील तातडीने पूर्वीप्रमाणे जमा करावीत, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी माहिती दिली.

वित्तमंत्री अजितदादा पवार  यांचे बरोबर शिक्षक आमदार कपील पाटील  यांनी चर्चा केली असता  त्यांनी आश्‍वासन दिल्याप्रमाणे शालार्थमधील अडचण 10 तारखेपर्यंत दूर केली. त्यामुळे 18 तारखेपर्यंत सर्व शिक्षकांचे मार्च महिन्याचे पगार  झालेले आहेत. काही जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार अद्यापी न झाल्याची माहिती मिळते. मात्र त्यांचेही पगार लवकरच होतील. याबद्दल अर्थमंत्र्यांचे आभार मानत त्यांना एप्रिलच्या पगाराबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, परिस्थिती खूप कठीण आहे तरीही आम्ही कर्ज काढू पण कर्मचारी, शिक्षकांचे पगार देऊ. आणि तातडीने आज त्यांनी एप्रिलचा पूर्ण पगार देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. त्याबद्दल तमाम कर्मचारी, शिक्षक यांच्यावतीने अजित दादा आणि महा विकास आघाडी सरकारचे जाहीर आभार.

याबाबत शिक्षण आयुक्त यांच्याशी दुरध्वनी वरून सुनिल गाडगे यांनी चर्चा केली . त्यांनीही तातडीने कार्यवाही करत सर्व शिक्षणाधिकारी यांना बिलाबाबत सूचना देण्यात येतील असे सांगितले.

यासाठी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,  सचिव विजय कराळे,कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष डॉ.किशोर डोंगरे, संभाजी पवार, संजय तमनर, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे,  किसन सोनवणे, इकबाल सय्यद, राजेंद्र जाधव, संजय पवार, संभाजी चौधरी, अशोक धनवडे, जॉन सोनवणे, रेवन घंगाळे, संतोष मगर,  अशोक अन्हाड, संतोष देखमुख, योगेश हराळे, काशिनाथ मते, जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, शंकुतला वाळुंज,संध्या गावडे,  अनघा सासवडकर, छाया लष्करे, जया गागरे आदींनी प्रयत्न केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post