अंतर"राखण्यासाठी "हरियाली"संस्थेचा उपक्रम

 अंतर"राखण्यासाठी "हरियाली"संस्थेचा उपक्रम : सुरेश खामकर
 

नगर (दि.04) : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्ति मध्ये कीमान 1 मिटरचे अंतर आवश्यक असावे या करीता हरियाली संस्थेच्या वतिने नगर शहरात अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने, भाजी बाजार या ठीकाणी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच 1 मिटर अंतरावर पांढरी पावडर वापरुन गोल रिंगण करुन उभा राहण्याची जागा निश्चित करण्यात येत आहे.


२१ दिवसाच्या लाँकडाऊन कालावधित नागरीकांनां अत्यावश्यक सेवा मिळाव्यात या करीता कीराणा व औषधांचे दुकाने आणि भाजीपाल्याचे दुकाने पूर्ण कालावधीसाठी उघडी ठेवण्यात आली आहेत. या ठीकाणी खरेदी करताना नागरीकांनी सामाजिक अंतर पाळावे व अनावश्यक गर्दी करु नये. जेणेकरुन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढणार नाही. यासाठी हि मोहीम शहरातील विविध भागातील दुकानाच्यां ठीकाणी राबविण्यात येत असल्याचे सुरेश खामकर यांनी सांगितले.


या मोहिमेत संदीप पावसे, उमेश भिंगारकर, दिलीप सकट, रमेश घुले आदि सहभागी झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post