नगर (दि.18) : लक्ष्मी कारंजा येथील महाराष्ट्रीय मेन्स पार्लरचे संचालक संतोष जाधव यांच्या पत्नी ज्योती जाधव यांनी पतीचा व्यवसाय गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन असल्याने परिवाराचा चरितार्थसाठी आनंद बाजार पोस्ट ऑफिसमध्ये जमापुंजी काढण्यासाठी गेल्या होत्या. ज्योती यांनी रक्कम काढली. पोस्टात थोडीफार गर्दी (सोशल डिस्टंग) असल्याने कर्मचारी अजित रायकवाड यांच्याकडून पैसे घेतले. गर्दी असल्या कारणाने ती रक्कम तशीच घरी आणल्यानंतर निवांतपणे मोजली असता, त्यात 10,000 रुपये जास्त आल्याचे लक्षात आले. ती रक्कम पुन्हा मोजून खात्री करुन घेतली असता नजरचुकीने जास्त असल्याचे जाधव कुटूंबियांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्वरित जाधव पती - पत्नीने पोस्ट ऑफिसात जाऊन सदर बाब पोस्ट अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली. अधिकारी व कर्मचार्यांनी तपासले असता, नजरचुकीने जास्त रक्कम गेल्याचे लक्षात आले. जाधव कुटूंबियांच्या या प्रामाणिकपणाचे अधिकारी व कर्मचार्यांनी कौतुक करुन आभार मानले. व असेही प्रामाणिक खातेदार आहेत, याचा पोस्ट ऑफिस व कर्मचार्यांना अभिमान असल्याची प्रतिक्रिया दिली.
सध्या गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेले लॉकडाऊनमुळे रोजगार, सर्व व्यवसाय पूर्णपणे बंद आहे; अशा परिस्थितीत दैनंदीन जीवनमान जगणे मुश्किल होत आहे. त्यामुळे जमापुंजी काढून, उसने-पासने घेऊन दिवस भागविण्याचे काम सर्वत्र सुरु आहे. अशा परिस्थितीत जादा आलेली 10 हजार रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे परत केलेल्याबद्दल जाधव कुटूंबियांचे अनेकजण कौतुक करत आहेत.