ट्रिपल आय डी आयोजित ऑनलाईन चित्रकला स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद


रणवीर मुसळे, श्रेया मुसळे, विधी गोपलानी , सुरभी बोरा प्रथम 


नगर (दि, 04) : येथील इन्स्टिट्यूट ऑफ Indian इंटेरिअर डिझायनर्स अर्थात ट्रिपल आय डी या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन चित्रकला स्पर्धेला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सध्या कोरोनामुळे सर्वजण घरी बसून आहेत. घरात असलेल्या लहान मुलांना देखील काय करावे हे कळेनासे झाले आहे. त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या उपक्रमांचे ऑनलाईन आयोजन करण्याचे संस्थेने ठरवले. याच उपक्रमांतर्गत ट्रिपल आय डी चे सर्व सदस्य आणि डिझयनर्स यांच्या मुलासाठी ही ओंन लाईन चित्रकला स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत सर्व मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तब्बल ६१ स्पर्धकांनी ऑनलाईन सहभाग नोंदविला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अवतारसिंग हिरा यांनी दिली. 

इयत्ता १ ली ते ३ री, इयत्ता ४ थी ते ७ वी, इयत्ता ८ वी ते १० वी, सदस्य आणि डिझायनर्स अशा चार  गटात ही स्पर्धा घेण्यात आली. पहिल्या गटासाठी माझे आवडते कार्टून, दुसऱ्या गटासाठी निसर्ग आणि मोठ्या गटासाठी कोरोना व्हायरस विरुद्ध लढ़ाई आणि  मेम्बर्स डिझायनर्स गटासाठी वर्क फ्रॉम होम असे विषय  देण्यात आले होते. अशी माहिती ट्रिपल आय डी चे सचिव अजय अपूर्वा यांनी दिली. 

या स्पर्धेचे परीक्षण  प्रसिद्ध चित्रकार व खडू शिल्पकार अशोक डोळसे व प्रसिद्ध शिल्पकार कांतु गवळी यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डिझायनर आशिष गुरुनानी, चंद्रकांत तागड, सुरज नन्नवरे, सूरज झिने, कविता पहूजा, ओम नगरकर, सतीश बजाज, कुणाल डुंगरवाल, संतोष गायकवाड  यांनी परिश्रम घेतले . 

संस्थेचे खजिनदार सचिन हिवाळे यांनी जाहीर केलेला निकाल पुढील प्रमाणे 

गट क्रमांक १) रणवीर विशाल मुसळे (प्रथम), ईशान उमेश जाजू (द्वितीय), श्रेया संदीप अहीरा (तृतीय)
गट क्रमांक २) श्रेया विशाल मुसळे (प्रथम), आदित्य वैभव देशमुख (द्वितीय), सृजन अजय दराडे ( तृतीय ) गट क्रमांक ३) विधी दिनेश गोपलानी (प्रथम), दिशा उमेश जाजू (द्वितीय) गट क्रमांक ४) सुरभी बोरा (प्रथम), शेख फारिन इरफान (द्वितीय), सय्यद खुदाईजा (तृतीय).

Post a Comment

Previous Post Next Post