नगर (दि, 04) : महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन असताना आणि त्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साई मंदिर बंद असतानाही साईभक्तांनी ऑनलाइन देणग्या देणे सुरू ठेवलं आहे. ३ एप्रिलपर्यंत साई संस्थानला एक कोटी ९० लाख रुपयांची देणगी मिळाली आहे अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
याबाबत बोलताना डोंगरे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या साई संस्थानानेही १७ मार्चपासून मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. मंदिर बंद असले तरी साईंचे ऑनलाइन दर्शन सुरू आहे. संस्थानाचे संकेतस्थळ व मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत. हे दर्शन घेताना साईचरणी दान अर्पण करत आहेत. त्यामुळे गेल्या अठरा दिवसांत १ कोटी ९० लाख २०१ रुपयांची देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.