वीज कामगार महासंघातर्फे 50 हजार रुपयांची मदत


नगर (दि.19) : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सहकारी पतसंस्थेने पंतप्रधान केअर्स फंड खाती 25 हजार रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 हजार रुपये, असा 50 हजारांचा निधी जमा करण्यात आला आहे.

कोरोना (कोविड-19) हा साथीचा रोगामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत असल्यामुळे देशावर आर्थिक संकट आले आहे. कोरोना विषाणूग्रस्तांना लागणारी औषधे साहित्य खरेदी, भोजन व्यवस्था,राहण्याची सोय, याकरिता देशाला तसेच महाराष्ट्राला सध्या मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सर्वांनी मदत करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सहकारी पतसंस्थेने पंतप्रधान केअर्स फंड खाती 25 हजार रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 25 हजार रुपये, असा 50 हजारांचा निधी जमा करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post