नगर (दि.19) : देशात कोरोना विषाणुच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॅाकडाऊन सुरु आहे. या विषाणू संसर्ग टाळण्यासाठी सावेडी टिव्ही सेंटर येथील नगर तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात शरद पवार विचार मंचच्या वतीने सॅनीटायझर कक्ष उभारण्यात आला आहे. या सॅनीटायझर कक्ष नगर तहसिलदार उमेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वीत करण्यात आले.
यावेळी नायब तहसिलदार शिल्पा पाटील, पुरवठा निरीक्षक विश्वास आढाव, गिरीश गायकवाड, मंडल अधिकारी वृषाली करोसिया, शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद, एम.एच.पठाण आदि उपस्थित होते.
शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ सय्यद यांच्या पुढाकारातून हा अद्यावत सॅनीटायझर कक्ष नगर तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आला आहे. आकर्षक पध्दतीने याची बनावट करण्यात आली असून, दर्शनी भागात कोरोनाच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी फ्लेक्स प्रिंटच्या माध्यमातून विविध संदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे बॅटरीवर चालणारी मोटार सॅनीटायझर कक्षात कार्यान्वीत आहे. लाईट गेली तरी दिवसभर हा सॅनीटायझर कक्ष कार्यान्वीत राहणार आहे. आलेल्या व्यक्तीवर पायापासून तर डोक्यापर्यंत फवारणी यामध्ये होणार आहे.