‘आमी’ संघटनेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 3 लाख

नगर, (दि.२४)  : कोरोना विषाणू संकटामुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर होऊन महिना उलटून गेला असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबरच आपण आर्थिक संकटामध्ये सापडलो आहे. या विषाणूला तोंड देण्यासाठी आर्थिक मदतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. शासन नागरिकांना विविध सुविधा देत आहे. दररोजचा लागणारा खर्च मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून नागरिकांना व शासनाला मदत करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमी एमआयडीसीतील उद्योजकांना एकत्र येऊन आपल्या ‘आमी’ संघटनेच्या माध्यमातून कोरोना संसर्ग विषाणूवर मात करण्यासाठी सुमारे 13 लाख रुपयांची मदत गोळा केली आहे. त्यांनी 3 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी व 10 लाख रुपये नगर जिल्ह्यातील या परिस्थितीवर खर्च करणार असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

एमआयडीसीतील उद्योजकांनी ‘आमी’ संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 3 लाख रुपयांचा धनादेश आ. संग्राम जगताप यांच्याकडे सुपूर्त करताना अध्यक्ष राजेंद्र कटारिया, उपाध्यक्ष संजय बंदीस्ती, सचिव दिलीप अकोलकर, खजिनदार सुमित लोढा, संस्थापक अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राजेंद्र कटारिया म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत  कोरोना आजारावर मात करण्यासाठी राज्य शासनाला 3 लाख रुपयांचा धनादेश देण्याचे काम आमी संघटनेने केला आहे. आ. संग्राम जगताप यांनी शहरामध्ये कोरोना संसर्ग विषाणूवर मात करण्यासाठी अडचणीत असणार्‍यांना मदत करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यांच्या प्रेरणेतून आम्हीही समाजाप्रती असलेल्या सहानूभुतीपोटी खारीचा वाट उचलण्याचा प्रयत्न करत आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post