शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घ्यावे : शेतकरी मराठा महासंघाची गृहमंत्र्याकडे मागणी


 ऊसाला भाव मिळावा आंदोलन ; 
शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घ्यावे  
: शेतकरी मराठा महासंघाची गृहमंत्र्याकडे मागणी

मुंबई (दि.06) :  ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ऊसाला योग्य भावा मिळावा यासाठी सन 2017 मध्ये घोटन येथे आंदोलन केले होते. यावेळी आंदोलकांवर गोळीबार व अश्रूधूर सोडण्यात आला होता, या सर्व आंदोलक शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी आमदार मोनिकाताई राजळे यांच्या उपस्थितीत राज्याचे गृहमंत्री नामदार अनिल देशमुख यांच्याकडे मराठा महासंघाचे राज्याचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी केली आहे.

यावेळी आ.मोनिकाताई राजळे, शेतकरी मराठा महासंघाचे राज्याचे अध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे, गणेश थोरात, संदीप मोटकर, प्रदीब गोबरे, भरत थोरात आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना संभाजीराजे दहातोंडे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी शेवगाव, पैठण तालुक्यातील ग्रामस्थांनी घोटन खानापूर येथे ऊसाला योग्य भाव मिळावा, या रास्त मागणीसाठी शांततेच्या मार्गाने घोटन तालुका शेवगाव येथे आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाकडून शेतकरी यांचेवर गोळीबार व अश्रूधूराचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी आंदोलक, ऊस उत्पादक शेतकरी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये काही शेतकरी जखमी झाले होते. तरी गृहमंत्री यांनी शेतकर्‍यांवरी गुन्हे मागे घ्यावी अशी विनंती करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post