गर्दी टाळण्याचे आवाहन
नगर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरातील माळीवाडा भागात नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करुन मास्कचे वाटप करण्यात आले. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी मास्कचे वाटप केले. तर कोरोना संबंधी माहिती देऊन या विषाणूपासून बचाव करण्याची जनजागृती केली.
जालिंदर बोरुडे म्हणाले की, कोरोना विषाणूने सर्वसामान्य धास्तावले आहेत. मात्र घाबरुन न जाता हे विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी खबरदारी म्हणून गर्दीत जाणे टाळले पाहिजे. सॅनीटायझर व निर्जंतुकीकरण साबणाने हात स्वच्छ करुन, बाहेर पडताना तोंडाला रुमाल अथवा मास्क लाऊन जाणे गरजेचे आहे. यामुळे आपण व आपले कुटुंबीय सुरक्षित राहणार आहे. हा विषाणू थोपविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
Tags:
Ahmednagar
