मालमत्ता कराची शास्ती माफ करावी : बोराटे


मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

नगर :  शहर हद्दीमध्ये मालमत्ता धारकांना मालमत्ता करामध्ये यापुर्वी वेळोवेळी शास्ती माफ करण्यात आली आहे. सध्या संपुर्ण देशात मंदी  असून यामध्ये कोरोनाची साथ सुरु आहे. त्यामुळे उद्योगधंद्यामध्ये मंदीचे वातावरण आहे. शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता कराची शास्ती माफ करावी या मागणीसाठी माजी विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी महानगरपालिकेच्या नुतन आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हंटले आहे की, नगर शहर हद्दीतील मालमत्ता धारकांना मालमत्ता करामध्ये यापुर्वी वेळोवेळी शास्ती माफ करण्यांत आली आहे. सध्या संपुर्ण देशामध्ये तसेच जिल्हयामध्ये कोराना आजादाने दहशत निर्माण केली आहे. मंदीचे सावट असल्याने उद्योगधंद्यामध्ये मोठा परिणाम झालेला आहे. या सर्व संकटांमुळे नागरीक हैदान झालेले आहेत. यामध्ये मालमत्ता भरणे अवघड झाले आहे. यातुन नागरीकांना दिलासा देण्यासाठी आयुक्तांनी शास्ती माफ करावी अशी मागणी बाळासाहेब बोराटे व मंगलताई लोखंडे यांनी केली आहे.

विविध समस्यांसह उद्योगधंद्यांमध्ये अतिशय मंदीचे वातावरण आहे. त्यातच कोराना सारख्या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. शहरातील मालमत्ता धारकांना मालमत्ता कर भरण्यामध्ये अनंत अडचणी येत आहेत. ही शास्तीची रक्कम भरणे दिवसेंदिवस मालमत्ता धारकांना परवडत नाही. शास्ती माफ करण्यात यावी अशी अशी मागणी वारंवार नागरिकांकडुन मोठ्या प्रमाणात होत आहे. मालमत्ता धारकांना शास्ती माफ केल्यास शहरातील नागरिकांकडुन जास्तीत जास्त मालमत्ता कर भरला जाईल व नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल तरी आयुक्तांनी शास्ती माफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी माजी विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post