वाचा : पुतळा रात्रीतून बसवला अन् पहाटे हटवला

नगर : छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा नगर येथील प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविण्यात आला होता. मात्र, कोणतीही परवानगी घेतली नसल्याने पोलिस प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवला आहे.

याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आठ ते दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील युवकांची व संघटनांची  गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शहरातील प्रोफेसर कॉलनी येथे रितसर बसवावा, मात्र, प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने युवकांनी कोणतीही परवानगी न घेता संभाजी महाराज यांचा पुतळा प्रोफेसर कॉलनी येथे बसवला होता. मात्र, प्रशासनाने तो हटवला आहे.

दरम्यान, प्रशासनाला पुतळा बसविल्याची माहिती मिळताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह तोफखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महापालिका अधिकार्‍यांना बोलावून प्रोफेसर कॉलनी चौकात रात्रीतून बसविलेला छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा हटवला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post