रविवारी प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित
काँग्रेसची महत्त्वपुर्ण बैठक : बाळासाहेब साळुंखे यांची माहिती
नगर (दि.06) : काँग्रस पक्षाची दि. 8 मार्च रोजी दुपारी 2.00 वाजता नगर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटनांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून सदर बैठक ही जिल्हा काँग्रेसच्या कालिका प्राईड लालटाकी, नगर येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी दिली आहे.
त्गाव तेथे काँग्रेस या महत्त्वपूर्ण अभियानाबाबत जिल्ह्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार असून सदर बैठकीसाठी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, तसेच नव्याने नेमणूक झालेले जिल्हा काँग्रेसचे प्रभारी ज्ञानेश्वर गायकवाड, डॉ.अनिल भामरे हेही उपस्थित राहणार असून जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना संघटनात्मक बाबींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
नगर जिल्हा, शहर जिल्हा काँग्रेसची संघटनात्मक कामकाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच युवक काँग्रेस , सेवादल, महिला काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस सहित सर्व संघटना व त्यांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नगर जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केले आहे.

Tags:
Ahmednagar