सावली दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या पुढाकारातुन दिव्यांग नवनाथच्या पायावर यशस्वी शस्रक्रीया
त्याच्या पालकाच्या चेह-यावरचा आनंद द्वीगुणीत झाला
नगर : शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील उसतोड कामगार असलेल्या आंबेकर कुटुंबीयाचा मुलगा नवनाथ एकनाथ आंबेकर सहा महीन्याचा असतांना पाठीत गोळा झाला तो गोळा खाजगी दवाखान्यात काढण्यात आला. त्याचा परीणाम पायावर होवुन दोन्ही पाय निकामी झाले. त्या पायावर जखमा झाल्या. त्यावर कोणताही उपचार होत नव्हता. अशाच जखमा घेवुन नवनाथने वयाचा सतारा वर्षापासुन त्रास सहन केला. अनेकांनी यावर काही उपचार नाहीत याला राजस्थानला न्यावे लागेल असा ही उपदेश दिला] परंतु कोणीही पुढाकार घेतला नाही.
वृत्तपत्रात याबाबत वृत्त प्रसीध्द झाले व याची दखल दिव्यांगा साठी काम करत असलेल्या सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था अहमदनगरने घेतली. नवनाथला दिव्यांग प्रमाणपत्रासह दिव्यांगासाठीची सायकल देण्यात आली व त्यावर शस्रक्रीयेबाबत तातडीने हालचाली सुरू करून त्यास पुढील उपचाराकामी नगर येथील जिल्हा रूग्णालयात अँडमीट करण्यात आले. नवनाथच्या सर्व तपासण्या करून दिनांक २२ फेब्रुवारी २०२० शनिवार रोजी नवनाथच्या एका पायावर यशस्वी शस्रक्रीया करण्यात आली. शस्रक्रीये नंतर त्याच्या पालकाच्या चेह-यावरचा आनंद द्वीगुणीत झाला होता.
नवनाथचे दोन्ही पायाचे आँपरेशन करून त्याला त्याच्या पायावर उभे करून त्याचे पुनर्वसन जो पर्यन्त होणार नाही, तो पर्यन्त सावली दिव्यांग कल्याणकारी संस्था शांत बसणार नाही असे सावली संस्थेचे बाबासाहेब महापुरे व चांद शेख यांनी सांगीतले नवनाथ चे पुनर्वसन करण्यासाठी सावली संस्थेचे सर्व पदाधिाऱ्यांनीही आपापल्या परीने योगदान दिले आहे.यावेळी बाबासाहेब महापुरे, चांद शेख, बाहुबली वायकर, गणेश महाजन, नवनाथ चे आई वडील व आत्या हजर होत्या.
Tags:
Ahmednagar
