नगर : शहर पाणीपुरवठा योजनेवरील वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहर व उपनगरातील पाणीपुरवठा आज विस्कळीत झाला आहे. वजी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
बुधवारी शहर पाणी पुरवठा योजनेवरील वीज पुरवठा खंडीत झाल्याने उपनगर भागाचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. विजवितरण कंपनी कडून एमआयडसी उप केंद्रामधून होणार्या विद्युत पुरवठ्याच्या वाहिनीमध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. उशिराने काम पुर्ण झाल्याने कमी पाणी पुरवठा केला जाणार आहे.
खंडीत वीजपुरवठ्यामुळे मुळानगर, विळद येथून होणारा पाणी उपसा सकाळी पुर्ण बंद पडला. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर आज रोटेशननुसार पाणी वाटपाच्या बोल्हेगाव, नागापुर, पाईपलाईन, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, स्टेशनरोड, विनायकनगर, सारसनगर, मुकुंदनगर, केडगाव, कल्याण रस्ता आदी परिसरात उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल असे मनपा प्रशासानाने स्पष्ट केले आहे. तरी पाण्याचा वापर काटकसरीने करावा अअसे आवाहन करण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar
