राहणे परिवारातर्फे दशक्रिया विधी दिनी सावलीस आर्थिक मदत


राहणे परिवारातर्फे दशक्रिया विधी दिनी  सावलीस आर्थिक  मदत

नगर (दि.15) :  कुक्कडवेढे, ता.राहुरी येथील रहाणे कुटुंबीयातील सौ.पुप्षाताई भिमराज रहाणे यांचे दहा दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले. पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त उपअभियंता भिमराज जयवंत रहाणे यांच्या पत्नी व एम.आय.डी.सी.तील उद्योजक व नगर येथील शिवराई फौंडेशन चे खजिनदार इंजि.अमोल रहाणे व पुणे येथील इंजि.अमृता वाघ यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या दशक्रीया विधीच्या निमित्ताने सावली या निराधार मुंलाच्या प्रकल्पास १५०००/- ची मदत सावली प्रकल्पाचे संस्थापक नितीश बनसोडे यांच्याकडे अमोल रहाणे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली. यावेळी शिवराई फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सीताराम काकडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

  सामाजिक क्षेत्रा  मध्ये रहाणे परिवाराचे नेहमीच योगदान राहिलेले आहे.स्वतः पुष्पाताई रहाणे या मराठा सेवा संघाच्या माध्यमातून कार्यरत होत्या.मराठा सेवा संघ नागरी पतसंस्थेच्या स्थापनेपासून संचालक व व्हा.चेअरमन म्हणूनही त्यांनी बराच काळ काम केले.तसेच जिजाऊ ब्रिगेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे संघटन उभे केले होते.त्यांच्या कार्याचा वसा जोपासणे या हेतूने सावलीच्या कार्यास आर्थिक मदत करून राहणे परिवाराने वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

असे उपक्रम समाजाने स्वीकारले तर अनेक सामाजिक संस्थाच्या कार्याला  बळकटी मिळेल असे मत  सावलीचे नितेश बनसोडे यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post