प्लास्टिकविरोधी मोहीम पुन्हा सुरू



प्लास्टिकविरोधी मोहीम पुन्हा सुरू
 
200 किलो प्लास्टिक जप्त; 16 हजाराचा दंड
 
नगर (दि.12) :  मनपाने प्लास्टिक विरोधी मोहीम पुन्हा सुरू केली आहे. मनपाच्या पथकाने आज दाळमंडई व मंगलगेट येथील तीन दुकानात कारवाई करीत 200 किलो प्लास्टिक जप्त करून 16 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

स्वच्छता निरीक्षक बीडकर, सामल, भांगरे, वाघ, विधाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांच्या आदेशानुसार मनपाच्या स्वच्छता विभागाकडून शहरात प्लास्टिक विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छतासर्वेक्षण अंतर्गत मनपामार्फत काही दिवसांपूर्वी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत मनपाचे अधिकारी, कर्मचारी गुंतल्याने प्लास्टिक विरोधी मोहिम थांबली होती. आता, मनपाकडून पुन्हा ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक बीडकर, सामल, भांगरे, वाघ , विधाते यांच्या पथकाने आज दुपारी दाळमंडई व मंगलगेट येथील बाजारपेठेतील तीन दुकानात कारवाई करून सुमारे दोनशे किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच या कारवाई एकूण 16 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला प्लॅस्टिक मुक्ती मोहीम राबविण्यासाठी कृतिआराखडा तयार करण्याच्या सूचना नुकत्याच दिल्या होत्या. त्यानुसार कृतिआराखडा तयार करून नगर शहरात मार्च महिन्यात प्लॅस्टिक मुक्तीची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एकत्रितपणे ही कारवाई करणार आहे. शहरातील प्लॅस्टिक गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post