जिल्हा बॅंक निवडणुकीचे बिगूल वाजले


 दि.13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी सभासद संस्थेचे ठराव मागविण्याची अंतिम तारीख

नगर (दि.13) : नगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून तीन महिने पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. मागील पाच फेब्रुवारीला झालेल्या या याचिकेच्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने बँकेची मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी बँकेची मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम पुन्हा जाहीर केला आहे. यानुसार गुरुवारपासून (13 फेब्रुवारी) येत्या मंगळवार पर्यंत (18 फेब्रुवारी) सभासद संस्थांकडून प्रतिनिधी ठराव मागवण्यास मुदत दिली गेली आहे. यानंतर दोन दिवसांत म्हणजे 20 फेब्रुवारीला जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेले संस्था प्रतिनिधी ठराव जिल्हा बँकेस द्यावे लागणार आहेत. 

बँकेसाठी मतदार यादी अंतिम करण्यचा सुधारित कार्यक्रम खालीलप्रमाणे राहिल.

दि.13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी सभासद संस्थेेचे ठराव मागविण्याचा अंतिम तारीख, दि.20 फेबु्रवारी रोजी प्राप्त संस्था प्रतिनिधीचे ठराव बँकेस देणे, दि.26 फेब्रुवारी बँकेने प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांना सादर करण्याची तारखी, दि.06 मार्च रोजी प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी यांना सादर करण्याची अंतिम तारीख, दि.6 मार्च सकाळी 11 वाजता प्रारुप मतदार यादी जिल्हया सहकारी निवडणूक अधिकारी यांनी प्रसिध्द करण्याची तारीख, दि.16 मार्च प्रारुप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी यांच्याकडे प्रारुप मतदार यादीवर आक्षेप सादर करण्याची अंतिम तारीख, दि.26 मार्च रोजी जिल्हा सहकारी निवडुकण अधिकारी यांना प्राप्त आक्षेपांवर निर्णय देण्याची अंतिम तारीख, दि.30 मार्च अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याची तारीख राहणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post