नगर (दि.13) : एम.आय.डी.सी.मधील जीकेएन सिंटर मेटल्स प्रा.लि.कंपनी मधील अहमदनगर वर्कर्स युनियनच्या ८ जागांसाठी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत श्रीमंत तात्या शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब निर्मळ व विठ्ठल हांडोरे यांच्या परिवर्तन पॅनलला सभासदांनी ८- ० अशा भरघोस मतांनी ऐतिहासिक विजय मिळवुन दिला, अहमदनगर वर्कर्स युनियनची निवडणुक अतिशय उत्साहात, खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली.
सभासदांनी परिवर्तन पॅनलवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,कामगारांच्या हिताला व कंपनीच्या प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन बाबासाहेब निर्मळ व विठ्ठल हांडोरे यांनी कामगारांसमोर बोलताना केले व ऐतिहासिक विजयाबद्दल कामगारांचे आभार मानलेे.या वेळी सभासदांनी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.बाबासाहेब निर्मळ,विठ्ठल हांडोरे,रमेश म्हस्के,खंडु फुंदे, मनोज गोरे, सोमनाथ ठोंबरे, सुरेश निमसे, संतोष थोरात , श्रीमंत तात्या शितोळे, पोपटराव कडुस आदिंनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Tags:
Ahmednagar
